Monday, September 2, 2024

माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 💰

स्टॅन्डवर वडा खाताना 
आजी येते रोजची फुकटी 
तेव्हा वाटतं 
माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 
झोपलेला बेवडा जेव्हा 
किरकोळ फालतू कारणं सांगून 
औषध मागतो तेव्हा वाटतं 
माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 
मित्राचा हवा सिलेंडर संपतो 
पोटाचा गोळा गोड गोड खाऊन गुरगुरतो 
तेव्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 
ह्या सणासुदीत जेव्हा फटाके उंच, उंच मुर्त्या आणि उंच रंगांची बेरंग दुनिया बघतो तेव्हा वाटतं
माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते
समाज समाजाची सेवा करून देखावा समाजात करतो 
पण असलेले प्रश्न नसल्यागत भासवतो 
तेव्हा समाजाला सामोरं जाताना 
समाजसेवा करताना वाटतं 
माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते
नसलेल्या वावरात वावर करताना 
समाजात नसलेल्या सृजनात
सुटा बुटात गेलेले 
मातीतून काँक्रिट झालेले मित्र बघताना वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते
पैसा जमवून वापरून उडवून संपवून पुन्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते🌼